प्रिय पुणे फक्त तुझ्यासाठी .....


आपल्या लाडक्या  गजबजलेल्या पीएमपी बसने अजून खूप प्रवास करायचाय,
वीकेंडला परत परत सिंहगडचा ट्रेक करायचाय
 रोडवर  सिग्नल सुटल्या सुटल्या गाडीवर बसून तर्राट सुटायचंय.
पुणे तुला आता पुन्हा निरोगी पहायचंय. 





रात्री ३ वाजता नळस्टॉपच्या पोह्यांचा आस्वाद घ्यायचाय,
भर थंडीत रस्तोरस्ती नाईट आऊट करायचाय.
काटाकिर्रची झणझणीत मिसळ अन जोशांचा वडा हे सगळं पुन्हा एकदा खायचंय,
पुणे तुला आता पुन्हा निरोगी पहायचंय. 

पुस्तकांसाठी पुन्हा एकदा एबीसी पालथा घालायचाय,
पुन्हा एकदा निवांत गप्पा ठोकत  येवले,साईबाचा चहा मात्र प्यायचाय.
पुन्हा एकदा तुळशीबागेतल्या गर्दीत हरवायचंय.
पुणे तुला आता पुन्हा निरोगी पहायचंय. 



मिरवणुकीला ढोलताशांच्या नादात अंग दुखेपर्यंत ठेका धरायचाय,
गर्दीतून वाट काढत काढत एकेक गणपती डोळे भरून पहायचाय.
विसर्जन मिरवणुकीत आवाज बसेपर्यंत 'गणपती बाप्पा मोरया' म्हणायचंय.
पुणे तुला आता पुन्हा निरोगी पहायचंय. 

बालगंधर्वला किंवा यशवंतरावला नाटकाचा प्रयोग बघायचाय.
जेएम एफसी ला फेरफटका मारायचाय.
पु ल देशपांडे उद्यानात मनसोक्त भटकायचंय
पुणे तुला आता पुन्हा निरोगी पहायचंय. 

दिवसभर जरी थकलो पुन्हा तुझ्या कुशीत निजायचंय,
आयुष्याचं गणित तुझ्याबरोबर सोडवायचंय.
आज जरी हरलो तरी पुन्हा उभं राहायचंय,
पुणे तुला आता पुन्हा निरोगी पहायचंय.


Comments

Popular Posts