बाप्पा, खास तुझ्यासाठी
प्रिय बाप्पा सप्रेम नमस्कार , आता तुला नवीन काय सांगायचं ? तुला सगळंच माहिती आहे. १४ कला आणि ६४ विद्यांचा तू अधिपती तुझ्यापासून ते काय लपून राहणार! बरोबर १० दिवसांपूर्वी तू आलास २ ऑगस्टला आणि आज आहे अनंत चतुर्दशी. यंदाचे १० दिवस पेट्रोलपेक्षा जास्त वेगाने उडून गेले असं वाटतंय. मार्च महिन्यापासून या कोरोनाचा जो काही कहर चाललाय त्याचा आपल्या वारीवर परिणाम झाला. ते काही मनाला अजिबात रुचलं नाही. पण आता त्याचा परिणाम तुझ्या उत्सवावर होईल असा विचार आमच्यासारख्या गणेशभक्तांच्या मनाला कधीच शिवला नाही. सगळ्यांना याची नक्कीच कल्पना असेल की कोणताही सण म्हटला की एक वेगळंच वातावरण आपोआप तयार होत असतं . ते वातावरण यंदा फार दिसले नाही. अगदी सांगायचंच झालं तर मंडळाची वर्गणी नव्हती, त्यावेळचा तो गोड संवाद नव्हता, देखावे तयार करतानाचा गोंधळ नव्हता ,मिरवणूक ,रथ अगदी काहीच नव्हतं. यंदा तू एकदम साधेपणाने आलास रे आणि आज कसा चाललास ते कळतच नाहीय. तू येणार म्हणून आनंद तर हो...






