प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा .....
आपला महाराष्ट्र
नावाप्रमाणेच महान असे राष्ट्र !!!
महाराष्ट्र असा नुसता उच्चार जरी केला तरी गात्रांतून एक नवचैतन्य संचारते. अशा कीर्तीचे आणि जगजाहीर ख्यातीचे हे आपले परममंगल राज्य. सर्वप्रथम या जन्मभूमीला, कर्मभूमीला माझा सलाम !!
तसे पाहायला गेलं तर संपूर्ण भारतवर्षालाच एक सुवर्ण इतिहास आहे, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे आणि अचंब्यात पाडणारा भूगोलदेखील.महाराष्ट्रात असे कोणतेच क्षेत्र नाही ज्याचा नावलौकिक झाला नाही. शेती ,कला-क्रीडा, राजकीय ,सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपल्या अग्रेसरतेचा झेंडा लावलेला आपल्याला पाहायला मिळतो.
महाराष्ट्राचा इतिहास केवळ चाळून पाहिले तर अभिमानाने ऊर भरून येतो आणि अंगावर शहारे येतात , मनाचं स्फुल्लिंग पेटून उठते. राजा शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची , रयतेच्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली ती याच महाराष्ट्रात त्यापुढे गेले तर पेशवाई सुद्धा याच महाराष्ट्रात राज्य करती झाली आणि त्यापुढे श्रीमन्महाराजांचे स्वराज्याची इच्छा तितक्याच तडफेने पूर्ण करणारे कितीतरी स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यपूर्व काळात या महाराष्ट्रात होऊन गेले. मग यामध्ये लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके,आगरकर , अशी किती म्हणून नावं घ्यायची. "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" या एका वाक्यातून महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्थापित झालेला महाराष्ट्राचा दरारा त्यची जरब आपल्याला लक्षात येते. रणधुरंधर पेशव्यांनी समस्त भारतवर्षाला अटकेपार झेंडे लावणे म्हणजे काय हे दाखवून दिले.
महाराष्ट्राला भव्यदिव्य असा सामाजिक वारसा आहे. महाराष्ट्रात जातीभेदाचे उच्चाटन, स्त्रीपुरुष समानता अशा अनेक विषयांत भरीव असे समाजकार्य झालेले आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा त्याच्याही खूप आधीपासून अस्पृश्यांवर एक प्रकारचा अन्याय होत होता, त्यांना समाजात मानसन्मान मिळवून देण्याच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतात न्यायव्यवस्था राखण्यासाठी संविधान निर्माण केले, चवदार तळ्याचा सत्याग्रह केला , महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्यांनी पुण्यातल्या भिडे वाड्यातून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा केला,छत्रपती शाहू महाराज असतील ज्यांनी कोल्हापूर सह अनेक ठिकाणी आपल्या सामाजिक कामाचा भरीव असा ठसा उमटवला , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असतील ज्यांनी आपले उभं आयुष्य स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयासाठी खर्ची घातले आणि अंदमानला काळ्या पाण्याची हृदयद्रावक अशी शिक्षा भोगली. त्याचप्रमाणे "सेवा है अग्निकुंड समिधा सम हम जले" या भावनेतून समाजकार्यासाठी तसेच सामाजिक एकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉक्टर हेडगेवार असतील. अशी असंख्य नावे आपल्याला सांगता येतील.
महाराष्ट्रातील संतपरंपरा देखील खूप मोठी आहे ज्याच्या सारातून जगण्याची दिशा मिळते. अवघ्या १८ व्या वर्षी विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानदेव असतील, आपल्या रसाळ अशा गाथेतून समाजप्रबोधन करणारे संत तुकाराम असतील, आपल्या लाघवी बोलीतून दासबोध लिखाणात उतरवणारे , बलोपासना व व्यायामाचे महत्व उभ्या महाराष्ट्राला पटवून देऊन ११ मारुतीची स्थापना करणारे समर्थ रामदास स्वामी असतील.अशा कितीतरी संतांनी मानवजातीला वेळोवेळी उद्बोधन केले . माणसाच्या आयुष्यात काय हवे , काय नको , आयुष्य कशाप्रकारे जगावं या साऱ्याची उकल आपल्याला अशा या सगळ्या संतांच्या विराट साहित्यातून आपल्याला गवसते.
महाराष्ट्राचे साहित्याचा वसाही असाच आहे. प्रसंगी हसवणारे, रडवणारे ,अंगावर काटे आणणारे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. एखादं भव्य असे काव्य असेल ,कविता असेल महाराष्ट्रातला माणूस अक्षरशः ते जगतो इतक्या ताकदीचं साहित्य आपल्या महाराष्ट्रात आहे. पु.ल देशपांडे , व. पु. काळे, आचार्य अत्रे , सुरेश भट , भालचंद्र नेमाडे , बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज , गदिमा यांच्यासारखी माणसं अजूनही माणसांच्या हृदयात घर करून बसलेली आहेत. विश्वास पाटील , रणजीत देसाई , बाबासाहेब पुरंदरे या मान्यवरांच्या लेखणीतून तर महाराजांचा , पानिपातांचा इतिहास अक्षरशः जिवंत झाला. हा अभिजात साहित्याचा वारसा घेऊन पुढे चाललेली माणसे आजही समृद्ध अशा साहित्यिक रूपाने पुढे येतच आहेत.
महाराष्ट्राच्या कला आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान हे भरीव आहे. गानकोकिळा म्हणून प्रसिध्द असलेल्या लता मंगेशकर असतील, क्रिकेटचा देव, मास्टर-ब्लास्टर म्हणूनदेखील ज्याला संबोधले जाते, असा आपला सचिन तेंडूलकर असेल ही दोन्ही व्यक्तिमत्वे आपल्या क्षेत्रात इतक्या उंचीवर आहेत की त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. १४ विद्या आणि ६४ कलांना प्रसन्न करून घेतलेली कितीतरी माणसं या महाराष्ट्रात आपल्याल पाहायला मिळतील.
महाराष्ट्रात खेळाच्या सामन्याबरोबरच अजून एका विषयाची चर्चा रंगते ती म्हणजे राजकारण. महाराष्ट्र इथेसुद्धा मागे नाही. यशवंतराव चव्हाणांपासून चालत आलेली एक राजकीय परंपरा अजून चालूच आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन , गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख, आर . आर . पाटील यांनी आपल्या हयातीत महाराष्ट्राला एका वेगळ्याच राजकीय उंचीवर नेऊन ठेवले.
महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय हा शेती. परंतु शहरीकरणाच्या काळात आता शेती फक्त खेड्यांमध्येच केली जाते. उस,कापूस ,सोयाबीन अशी बरीच पिके महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतली जातात. शेतीव्यवसाय हा असा व्यवसाय आहे ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होत असतो. खेडी स्वयंपूर्ण ठेवली तर त्याचा खूप फायदा होतो असे कुणीतरी सांगितले होते; ते तितकच खरंय. खेडी स्वयंपूर्ण झाली तर राज्य स्वयंपूर्ण होईल आणि अशीच सगळी राज्ये स्वयंपूर्ण झाली तर भारत महासत्ता आणि विश्वगुरु बनल्याशिंय राहणार नाही. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे.
महाराष्ट्राला विविधतेच देखील वरदान प्राप्त झालंय. पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा , खान्देश , कोकण , विदर्भ असे महाराष्ट्राचे विविध प्रांत आहेत. महाराष्ट्राची मुख्य भाषा ही मराठी जरी असली या सगळ्यांमध्ये त्या मराठीचा वेगवेगळा लहेजा , एक वेगळे रांगडेपण दिसून येते. खाद्यपदार्थ देखील वेगवेगळे पाहायला मिळतात. रूढीपरंपरा देखील वेगवेगळ्या आढळून येतात. जरी या सर्व अंगांनी महाराष्ट्र वेगळा असला तरी तो एकसंध आहे,एक आहे.
भौगोलिक दृष्टीने विचार केला तर काय नाही हो आपल्या महाराष्ट्रात !!! सह्याद्री सारख्या उंचच उंच अगदी आकाशाला गवसणी घालणाऱ्या अशा पर्वतरांगा आहेत. नुसते पाहिले असता पोटात गोळा येऊन भोवळ यावी इतक्या उंचीच्या खोलच खोल दऱ्या आहेत .दक्खन, मसाई , कास यांसारखी पठारे आहेत. विस्तीर्ण अशा उभ्या मानवजातीची तहान भागवणाऱ्या नद्या आहेत, जणू काही जीवनाची व्याख्या सांगावी असे अथांग समुद्र आहेत. नयनरम्य किनारपट्ट्या आहेत. काय काय मम्हणून सांगायचं असा हा महाराष्ट्र कितीही ठरवलं तरी डोळ्यात मावत नाही.

Comments
Post a Comment